Modi Shah Ordered Shinde to Merge Party with BJP Claims Sanjay Raut After Delhi Visit

Modi Shah Ordered Shinde to Merge Party with BJP Claims Sanjay Raut After Delhi Visit

Esakal

पक्ष भाजपमध्ये विलीन करा, मोदी-शहांनी शिंदेंना आदेश दिल्याचा राऊतांचा दावा; दिल्ली दौऱ्यावरून टीका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली दौरा केल्यानं राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून शिंदे अस्वस्थ असल्याचं म्हटलं जातंय.
Published on

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं दीडशे पारचा नारा दिलाय. जवळपास स्वबळाच्या घोषणाच केल्या जात आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरच एकनाथ शिंदे तातडीने शुक्रवारी मध्यरात्री दिल्लीला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घ्यायला गेले होते अशी माहिती समजते. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेत संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधलाय. दिल्लीत भेटीवेळी मोदी आणि अमित शहा यांनी शिंदेंना पक्ष भाजपमध्ये विलीन करायचा आदेश दिला असल्याचा दावा राऊतांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com