पालघरमध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादीला खिंडार, शिंदेंच्या माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

Shrinivas Vanga Join BJP: माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पालघरमध्ये शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे.
Shrinivas Vanga Join BJP

Shrinivas Vanga Join BJP

ESakal

Updated on: 

निखिल मेस्त्री

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेनेने आमदारकीचे तिकीट नाकारलेले उमेदवार आणि माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेला राम राम करत भाजपचे कमळ हाती धरल्याने पालघरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. तर जव्हारमधील शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य, अर्बन बँकचे संचालक हबीब शेख यांच्यासह अनेक ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांनी भाजपात प्रवेश केल्याने पालघर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळत मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर नेत्यांनी श्रीनिवास वनगा, हबीब शेख यांच्यासह सरपंच सदस्यांचा भाजप प्रवेश केला.

Loading content, please wait...