CM शिंदेंच्या शब्दाखातर आम्ही शांत आहोत; हल्ल्यानंतर बांगर आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM शिंदेंच्या शब्दाखातर आम्ही शांत आहोत;  हल्ल्यानंतर बांगर आक्रमक

CM शिंदेंच्या शब्दाखातर आम्ही शांत आहोत; हल्ल्यानंतर बांगर आक्रमक

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे गेले असता शिवसैनिकांकडून त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला गेला. यादरम्यान संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांनी 50 खोके एकदम ओके असे नारे देखील दिले. अमरावतीत संतोष बांगर यांच्या गाडीच्या काचेवर शिवसैनिकांकडून हल्ला केला. यानंतर संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा आव्हान केलं आहे.

आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा आव्हान केलं आहे. “माझ्या गाडीच्या काचेला टच करून दाखवा”, असं त्यांनी म्हंटलं आहे. याआधीही त्यांनी असंच चॅलेंज दिलं होतं. आताही त्यांनी त्याचाच पुनरउच्चार केला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना संतोष बांगर म्हणालेत की, पोलिसांनी काल थांबवलं नसतं तर हल्ला करणाऱ्यांना कालच बघितलं असतं. आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तिथेच ठेचू असंही ते म्हणालेत. खरी शिवसेना कोणाची हे लवकरच कळेल तसेच हल्ला करणारे बाळसाहेबांचे सैनिक असूच शकत नाहीत असंही ते पुढे म्हणालेत.

हेही वाचा: ...तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रिया

पुढे बोलताना ते म्हणाले की, असे प्रकार चोरटे लोक करतात. संतोष बांगरवर हल्ला करायला वाघाचं काळीज लागतं. चोरासारखा हल्ला करणारे शिवसैनिक कसले? डाका काय असतो माहिती आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसंच कालच्या हल्ल्यानंतर माझे कार्यकर्ते रात्रभर झोपलेले नाहीत. पण फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाखातर आम्ही शांत आहोत, असं वक्तव्य बांगर यांनी केलं आहे.

हेही वाचा: Eknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला

बांगर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला. बांगर यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी 15 ते 20 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटात सर्वात शेवटी सहभागी झालेले आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात शिवसैनिकांचा उद्रेक पाहायला मिळाला.

टॅग्स :CM Eknath ShindeShiv Sena