Shivsena Bhavan : शिंदे गट आता शिवसेना भवनाचाही ताबा घेणार; आमदाराच्या दाव्यावर राऊत म्हणाले...

uddhav thackeray and eknath shinde
uddhav thackeray and eknath shinde

मुंबई - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत ४० आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. सुरुवातीला शिंदे गटाने उद्धव ठाकरे कुटुंबाविषय़ी मवाळ भूमिका घेतली होती. मात्र आता शिंदे गट आक्रमक झाला असून शिवसेना भवनावरही शिंदे गट ताबा घेणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यातच एका आमदाराने केलेल्या विधानमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. Shivsena Bhavan news in Marathi

uddhav thackeray and eknath shinde
Sheetal Mhatre: उध्दवजी,एकांतात दिलेला शब्द...शीतल म्हात्रेचे ट्विट चर्चेत

दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाने मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. आता शिवसेना भवनाकडे शिंदे गट चालून जाणार हे निश्चित मानलं जावू लागलं. आता याबाबत अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी मोठं विधान केलं आहे. राणा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेतील. उद्धव ठाकरे स्वत: त्यांना शिवसेना भवनाची चावी देतील, असा दावाही रवी राणा यांनी केला आहे.

uddhav thackeray and eknath shinde
CM Shinde in Nagpur : फडणवीसांच्या जोडीने मुख्यमंत्री संघ मुख्यालयात; संजय राऊतांनी दिला सल्ला

दरम्यान रवी राणा यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रवी राणा म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या कार्यालयात बसून उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक टक्केवारीचे काम करत होते. यातून शिवसेनेच्या कार्यालयाचा दुरुपयोग होत होता. वास्तविक पाहता महापालिकेवर प्रशासक आहे. नगरसेवकपदही रद्द झाले आहेत. त्यामुळे नगरसेवकांचं टक्केवारीचं सुरु असलेलं काम बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयाला सील ठोकण्यात आल्याचं रवी राणा यांनी म्हटलं.

हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

uddhav thackeray and eknath shinde
Maharashtra Politics : तुमच्या कर्तृत्वाला सलाम, फक्त....; ठाकरे गटाचं शिंदे गटाला चॅलेंज

शिंदे गट शिवसेना भवनाचा ताब्यात घेणार असा दावा करण्यात आल्याच्या प्रश्नावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. राऊत म्हणाले की “त्यांचे बाप आले पाहिजेत. जर त्यांचा बाप असेल तर येईल. एक बाप असेल तर येतील. हे मी ऑन रेकॉर्ड सांगतोय.

राऊत पुढ म्हणाले की, शिवसेना भवन शिवसैनिकांचं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली वास्तू शिवसेनेच्या नावानेच राहील. ती आमची आहे, अशा वल्गना फार होतात, पण तुमच्याकडे औटघटकेची सत्ता असून ती सांभाळा. शिवसेना भवन ताब्यात घेण्याची भाषा वापरलीत तर महाराष्ट्रातील वातावरण बिघडेल. तुम्हाला वातावरण बिघडवायचं असेल तर आमची तयारी आहे, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com