Shinde vs Thackeray: ''सत्तासंघर्षाचं प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे जाणार''

सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला
Shinde vs Thackeray
Shinde vs Thackerayesakal

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मागील तीन दिवसांपासून सुनावणी सुरू होती. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच खंडपिठासमोर ही सुनावणी पार पडली आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला आहे. ही सुनावणी आता ७ सदस्यीय घटनापीठासमोर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Shinde vs Thackeray supreme court hearing 7 Judge bench maharashtra politics )

सुनावणीनंतर दोन्ही गटाकडून अनेक प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोर्टात शिवसेनेकडून उपस्थित असलेल्या अनिल परब यांनी मोठा विश्वास व्यक्त केला आहे.

Shinde Vs Thackeray: तुमच्या सुप्रीम कोर्टात बैठका झाल्यात का...त्या दाव्यावरुन सेनेच्या बड्या नेत्याचा सवाल

काय म्हणाले परब?

“हे प्रकरण सात जणांच्या घटनापीठाकडे जाईल असे आम्हाला वाटते. याचं कारण म्हणजे नबाम रेबिया केसमध्ये जे मुद्दे नव्हते ते मुद्दे या खटल्यात उपस्थित झालेले आहेत. नबाम रेबिया खटल्यावर पाच न्यायाधीशांनी निर्णय दिला होता. आता बदललेल्या परिस्थितीतही पाच न्यायाधीशच निर्णय देणार असतील तर भविष्यात काही अडचणी निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे हा खटला सात सदस्यीय घटनापीठाकडे सोपवावा अशी मागणी आमच्या पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे,” असे अनिल परब म्हणाले. तसेच आमची ही मागणी मान्य होईल असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला.

Shinde Vs Thackeray : "न्यायालय देखील चुकू शकतं" ; उल्हास बापट असं का म्हणाले?

यासोबतच, न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला. या खटल्यावरील सुनावणीदरम्यान आठ मुद्दे विचारात घेण्यात आले. या आठ मुद्द्यांपैकी एका मुद्यावरील निकाल सात सदस्यीय घटनापीठ घेईल असे वाटत आहे.

त्यानंतर सर्व आठ मुद्द्यांवर चर्चा होईल, असे वाटत आहे. कारण बरेचसे मुद्दे एकमेकांत गुंतलेले आहेत. त्यामुळे जेव्हा एका मुद्द्यावर जेव्हा निर्णय होईल, तेव्हा अन्य मुद्द्यांवरील निर्णय आपोआपच होईल. असंही परब यांनी यावेळी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com