शिर्डीहून एक ऑक्‍टोबरपासून बंगळूर, दिल्ली विमानसेवा 

Shirdi to Bangalore, Delhi  Airlines from 1st October
Shirdi to Bangalore, Delhi Airlines from 1st October

पोहेगाव : शिर्डी विमानतळावरून येत्या एक ऑक्‍टोबरपासून बंगळूर-शिर्डी-मुंबई आणि शिर्डी-दिल्ली अशी विमानसेवा सुरू होणार आहे. तसेच मुंबईसाठी रोज आणखी एक फेरी वाढणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी आज येथे दिली. 

अधिक माहिती देताना काकाणी म्हणाले, "या विमानतळावरून उड्डाणाची सुरवात गेल्या वर्षी एक ऑक्‍टोबरला झाली होती. तोच मुहूर्त साधून प्राधिकरणाने नवीन विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन विमानसेवा सुरू करण्यासाठी 12 कंपन्यांनी परवानगी मागितली होती. शिर्डी-दिल्ली विमानसेवा शक्‍य झाल्यास 20 सप्टेंबरपासूनच सुरू होऊ शकते, अन्यथा एक ऑक्‍टोबरपासून "स्पाइस जेट'तर्फे बोइंग-737-800 या 189 आसनी विमानाची दिल्ली-शिर्डी सेवा सुरू होणार आहे. दिल्लीहून दुपारी पाऊण वाजता हे विमान शिर्डीकडे उड्डाण करेल. ते दुपारी अडीचला शिर्डी विमानतळावर पोचेल. त्यानंतर अर्ध्या तासाने, म्हणजे तीन वाजता हे विमान पुन्हा दिल्लीसाठी उड्डाण करेल. 

शिर्डी-बंगळूर विमानसेवा एक ऑक्‍टोबरपासून सुरू होईल. "स्पाइस जेट'चे 78 आसनी विमान बंगळूरहून सकाळी साडेदहा वाजता निघेल. ते दुपारी साडेबारा वाजता शिर्डी विमानतळावर उतरेल. हे विमान 12 वाजून 50 मिनिटांनी मुंबईकडे प्रयाण करील. ते दुपारी तीन वाजून 40 मिनिटांनी पुन्हा शिर्डी विमानतळावर दाखल होऊन, चार वाजता बंगळूरच्या दिशेने उड्डाण करील.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com