Uorfi Javed : मी एकटी पडली नाही, महाराष्ट्र माझ्या पाठिशी; चित्रा वाघ संतप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uorfi Javed and Chitra Wagh news in Marathi

Uorfi Javed : मी एकटी पडली नाही, महाराष्ट्र माझ्या पाठिशी; चित्रा वाघ संतप्त

बीड - अतरंगी मॉडेल उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद टोकाला जाताना दिसत आहे. आज बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांचं रौद्ररुप पाहायला मिळालं. तसेच महाराष्ट्रा माझ्या पाठिशी असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं. Uorfi Javed and Chitra Wagh news in Marathi

हेही वाचा: Video : बारामतीचं घड्याळ बंद पाडण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बावन्नकुळेंच्या कार्यक्रमात चाललंय काय?

चित्रा वाघ म्हणाल्या, मला घेरण्याचं काम सुरू आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुमच्यात जेवढा दम असेल तो लावा. मी महाराष्ट्रात नंगानात चालू देणार नाही. मी एकाकी पडले नाही. महाराष्ट्रातील जनता माझ्यासोबत आहे. रोज मी वेगवेगळ्या जिल्ह्यात जाते. दादा, काका, मामा, आया-बाया सगळे थांबून मला सांगतायत, चित्रा ताई तुम्ही चांगला मुद्दा घेतला, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं.

हेही वाचा: Narendra Modi : मोदींचा क्रूझ 'गंगा विलास'ला ग्रीन सिग्नल; जाणून घ्या पंतप्रधानांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे

मी आधी आई आहे. मला मुलं आहे. तुम्ही आमच्या मुलाचे फोटो व्हायरल केले आहेत. तुम्हाला काहीच इथिक्स राहिले नाहीत. आमच्या मुलाचा राजकारणाशी संबंध नसताना त्यांचे फोटो व्हायरल करण्याचं काम केलं. ज्यांनी बातम्या केल्या, तुमच्या घरात आया-बहिणी नाही का, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

आज विरोध केला नाही, तर नंगानाच संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल. तुमचं प्रोफेशन आहे, त्यापद्दतीने पेहराव करा. केवळ चिंध्या लावून फिरतायत. तीन एवढी निर्लज्य आहे की म्हणते माझा हा भाग दिसला आणि हा भाग दिसला नाही. तर कारवाई होणार, हे कुठली बाई बोलू शकते, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. दरम्यान इथे धर्माचा विषय नसून केवळ विकृतीचा आहे, असही त्यां म्हणाल्या.

हेही वाचा: Video : बारामतीचं घड्याळ बंद पाडण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बावन्नकुळेंच्या कार्यक्रमात चाललंय काय?

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उर्फी मुद्दावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, तिच्या स्टाईलमध्ये मला काहीही वावग वाटत नाही. शिवाय भाजपकडून इतर कोणत्याही नेत्याने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे चित्रा वाघ एकट्या पडल्याची चर्चा सुरू झाली होती.