Shirdi Loksabha: भाऊसाहेब वाकचौरे की बबनराव घोलप? शिर्डीच्या तिकीटावरून मातोश्रीवर खडाजंगी.. उद्धव ठाकरेंसमोर पेच

शिर्डी मतदार संघात ठाकरे गटाच्या दोन उमेदवारांमध्ये वाद बघायला मिळू शकतो. शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि पाचवेळा आमदार राहिलेले बबनराव घोलप यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.
Rajya Sabha Election
Rajya Sabha Election e sakla

Shirdi Loksabha: शिर्डी लोकसभा मतदार संघात वर्षानुवर्ष शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. शिवसेनेत फूट पडल्याने यंदाच्या निवडणुकीत वेगळा निकाल बघायला मिळू शकतो. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे शिंदे गटात गेल्याने शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेना (उबाठा)गटात मोठा संघर्ष बघायला मिळतोय. शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसमोर उमेदवारीच्या निर्णयाचे आव्हान निर्माण झालंय.

शिर्डी मतदार संघात ठाकरे गटाच्या दोन उमेदवारांमध्ये वाद बघायला मिळू शकतो. शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि पाचवेळा आमदार राहिलेले बबनराव घोलप यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे. शिर्डी मतदार संघातून उमेदवारी कोणाला द्यायची, हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी अवघड ठरणार आहे.

शिर्डी मतदार संघातून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना ठाकरे गटातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बबनराव घोलप नाराज झाले होते. त्यानंतर घोलपांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि वाकचौरेंच्या उमेदवारीला विरोध दर्शवला.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पाच वेळा आमदार राहिलेल्या बबनराव घोलपांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते.

घोलप यांची संपर्क प्रमुख नेमणूक त्यांना नव्या पदाधिकांऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या सुचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या. मात्र, उद्धव ठाकरेंनी वाकचौरे यांना परस्पर उमेदवारी घोषित केल्याने बबनराव घोलप अस्वस्थ झाले. त्यामुळे त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत नाराजी व्यक्त केली होती.(Latest Marathi News)

Rajya Sabha Election
जी-२० परिषदेसाठी भारतात येणार कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष, पण 'या' कारणामुळे व्यक्त केली नाराजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com