तोंडी तलाक विधेयकाबाबत ओवेसी यांचे राजकारण सुरू - जयाप्रदा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

शिर्डी - तोंडी तलाक विधेयकाबाबत "एमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी राजकारण करीत आहेत. मुस्लिम महिलांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नात त्यांनी राजकारणाची पायरी उतरून पाठिंबा दिला पाहिजे, असे मत अभिनेत्री, माजी खासदार जयाप्रदा यांनी आज व्यक्त केले.

साईदर्शनासाठी जयाप्रदा आज येथे आल्या होत्या. साईबाबा संस्थानातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ""महिलांचे काय प्रश्‍न आहेत, काय दु:ख आहेत, हे ओवेसी यांनी जाणून घेतले पाहिजे. हा राजकीय मुद्दा नाही. अणुकरारासाठी सर्व पक्षांनी तत्कालिन पंतप्रधानांना पाठिंबा दिला होता. तसाच पाठिंबा या विधेयकाला दिला पाहिजे. "तलाक' म्हणून नाते तोडले जात असेल, तर हा महिलांवर अन्याय आहे. निर्भयाचे विधेयक असो वा तोंडी तलाकचे, मी महिलांच्या अन्यायाविरोधात आहे. या विधेयकाला माझे पूर्णपणे समर्थन आहे.''

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत मुस्लिम महिलांनी भाजपचे झेंडे हातात घेतले. त्यातून असे दिसते, की महिलांना मान-सन्मान, सुरक्षा, स्वातंत्र्य पाहिजे. त्यामुळे या विधेयकाशी मी सहमत आहे. गुजरात विधानसभेच्या निकालात तेथील जनतेने मोठे यश दिले. त्यामुळे येत्या पाच वर्षांत तेथील सरकार शेतकऱ्यांची दु:ख दूर करील, असे त्या म्हणाल्या.

Web Title: shirdi news jayaprada talking