साईंच्या दानपेटीत चार कोटी जमा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

शिर्डी - रामनवमी उत्सवासह चार दिवसांत साईबाबा मंदिराच्या दानपेटीत चार कोटी 16 लाख रुपये दक्षिणा जमा झाली. या उत्सवात 14 देशांतील भाविकांनी भाग घेतला. बाबांच्या चरणी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे परकी चलन अर्पण केले.

उत्सव काळात रोज सरासरी 60 हजार भाविकांनी साईदर्शन घेतले. या कालावधीत सशुल्क साईदर्शन सेवेच्या माध्यमातून संस्थानाला तब्बल 67 लाखांचे उत्पन्न मिळाले. प्रसादालयात तीन दिवसांत एक लाख 94 हजार भाविकांनी मिष्टान्नाचा लाभ घेतला. संस्थानाच्या भक्तनिवासात 45 हजार भाविकांनी मुक्काम केला. साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ही माहिती दिली. या वेळी प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब घोरपडे, डॉ. अशोक किसवे उपस्थित होते.

Web Title: Shirdi Saibaba Donation Box

टॅग्स