शिशिर शिंदे शिवबंधनात

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक नेते शिशिर शिंदे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मागील काही दिवसांपासून शिशिर शिंदे "मनसे'ला रामराम ठोकणार असल्याची चर्चा होती. आज शिवसेनेच्या 52 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधत व हातात भगवा झेंडा देऊन स्वागत केले.

यानंतर बोलताना काहीसे भावुक झालेले शिंदे म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांचा हातात हात घेतल्यानंतर मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा स्पर्श होत असल्याचे वाटते. वयाच्या सतराव्या वर्षी एका हातात धोंडा, तर दुसऱ्या हातात भगवा झेंडा घेऊन शिवसेनेत सहभागी झालो होतो. मात्र, त्यानतंर "मनसे'त गेलो, पण "मनसे'त असताना मी शिवसेनेबाबत जे काही बोललो असेल त्याबाबत माफ करा. मोठ्या मनाने मला पुन्हा शिवसेनेत प्रवेश दिल्याने मी आभारी आहे. आता पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा सर्वत्र फडकवण्यासाठी त्याच हिमतीने मी कामाला लागणार असून, शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही.''

Web Title: shishir shinde in shivsena politics