Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळी सुरुच राहणार; फडणवीसांचं आश्वासनं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics eknath shinde led maharashtra government may be close Shivbhojan Thali

Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळी सुरुच राहणार; फडणवीसांचं आश्वासनं

मुंबई : शिवसेनेच्या पुढाकारानं महाविकास आघाडी सरकारनं सुरु केलेली शिवभोजन थाळी यापुढेही सुरु राहिल, असं आश्वासनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. याबाबत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीसांशी संपर्क साधला होता. (Shiv Bhojan thali will continue in Maharashtra Devendra Fadnavis givts promises)

हेही वाचा: 'वेदांता-फॉक्सकॉन'साठी आम्हीच सर्व केलं, मविआ सरकारनं नाही - फडणवीस

राज्यातील गरीब कष्टकरी जनतेला दहा रुपयात शिवभोजन थाळी हा उपक्रम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं सुरु केला होता. शिवसेनेच्या निवडणूक जाहीरनाम्यात शिवभोजन थाळी सुरु करण्याचं आश्वासनं दिलं होतं, सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे आश्वासन पूर्ण केलं.

हेही वाचा: नवरात्रीसाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मिळणार? फडणवीसांचे संकेत

दरम्यान, कोविडच्या काळात जेव्हा सर्वकाही बंद होतं तेव्हा या शिवभोजन थाळीची किंमत दहा रुपयांवरुन पाच रुपये करण्यात आली होती. या थाळीमुळं रस्त्यावर राहणारे, बेघर गरीब लोकांची भूक भागली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारनं सर्वांसाठीच ही थाळी सुरु केली होती. या शिवभोजन थाळीची राज्यभरात अनेक केंद्र निर्माण करण्यात आली होती. या केंद्रांवर रांगा लावून जनतेनं या थाळीचा लाभ घेतला होता.

हेही वाचा: पोलीस विभागात २० हजार पदांची भरती; फडणवीसांची मोठी घोषणा

राज्यात सध्या सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे सरकारकडून ही थाळी बंद करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली. या भेटीनंतर शिवभोजन थाळी पुढे सुरुच राहिलं असं आश्वासन फडणवीसांनी भुजबळांना दिलं.