Shiv Jayanti in Agra : उत्साह शिगेला, पण…; आग्रा किल्ल्यातील शिवजयंतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह | Shiv Jayanti in Diwan-i-Aam New Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shiv jayanti in agra fort archeology department new update  shivjayanti in agra fort Diwan-i-Aam

Shiv Jayanti in Agra : उत्साह शिगेला, पण…; आग्रा किल्ल्यातील शिवजयंतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह

Shiv Jayanti in Diwan-i-Aam : पुरातत्व खात्याने आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर देशभरातील शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला आहे. आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’मध्ये १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्याला पुरातत्व खात्याने हिरवा कंदील दाखवला आहे. पण यानंतर आता पुन्हा एकदा आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यावर प्रश्नचिन्ह उभं राहीलं आहे.

आग्रा किल्ल्यातील या दिवाण-ए-आममध्ये मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचा प्रकार समोर आला आहे. या भेगांमुळे दगड पडण्याची भीती लक्षात घेत या भागात जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे येथे शिवजयंती साजरी करण्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

पुरातत्व विभागाने न्यायालयात आम्ही परवानगी द्यायला तयार आहोत असे सांगितले आहे.मात्र या ‘दिवाण-ए-आम’मध्ये पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. विभागाने सांगितले की, ११ फेब्रुवारी रोजी जी २० परिषदेचे सांस्कृतीक कार्यक्रम झाले, त्यानंतर या हॉलमध्ये १० ठिकाणी भेगा पडल्या आहेत.

त्यानंतर दिवाण-ए-आममध्ये पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. आता न्यायालयात विभागाने १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरा करण्यास परवानगी देऊ असे सांगितेल आहे. यामुळे आता दोन दिवसात या भेगा दुरुस्त करून परवानगी देण्यात येते की, आजून दुसरा काही निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आग्रा येथील ऐतिहासीक किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांनी परवानगी मागितली होती. मात्र, वारंवार परवानगी नाकारण्यात आली. याप्रकरणी नंतरन्यायालयात धाव घेतली गेली. त्यानंतर आता पुरातत्व खात्याने शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली आहे.यामुळे देशभरातील शिवप्रेमींमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.