रायगडचा डिस्कोथेक करून टाकला; संभाजीराजेंचा तीव्र संताप

raigad lighting sambhajiraje
raigad lighting sambhajiraje

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करता येणार नाही. शिवनेरी किल्ल्यावर सरकारने 144 कलम लागू केल्याने शिवभक्तांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. दरम्यान, शिवजयंतीनिमित्त रायगडवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने केलेल्या या विद्युत रोषणाईवर कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे. रायगडवर करण्यात आलेली ही प्रकाशयोजना अत्यंत विचित्र असून महान वारशाचा अपमान करणारी आहे अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवरून फोटो शेअर करत विद्युत रोषणाई अपमान करणारी असल्याचं म्हटलं आहे. संभाजीराजेंनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो !!

कोरोनाचं संकट पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण झाला असल्यानं राज्य सरकारने खबरदारी म्हणून शिवभक्तांसाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. शिवजयंतीला कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही असं आधीच जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर शिवनेरी किल्ल्यावर कलम 144 लागू केल्यानं या नाराजीत भर पडली होती. 

काय आहे नियमावली
शिवनेरी किंवा गडकिल्ल्यावर एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी. 
सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करून नये. लाइव्ह, ऑनलाइन प्रक्षेपण करावे.
रॅलीचं आयोजन न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. 
मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com