मुख्यमंत्र्यांविरोधात लिहिणाऱ्याला शिवसैनिकांकडून चित्रपटगृहात मारहाण

CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackerayesakal
Summary

मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात (CM Uddhav Thackeray) सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपार्ह पोस्ट टाकणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलंय. जळगावात (Jalgaon) आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका व्यक्तीला शिवसैनिकांनी मारहाण केल्याचं समजतंय. ही व्यक्ती ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी गेली असता, तिला या पोस्टसंदर्भात जाब विचारत चित्रपटगृहाच्या बाहेरच मारहाण करण्यात आलीय. हा संपूर्णप्रकार जिल्ह्यातील धरणगाव शहरात घडलाय.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, धरणगावमधील हेमंत द्वितीये यांनी सोशल मीडियावरील जळगाव शहरातील एका ग्रुपवर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या पोस्टमुळं शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली. ही पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर हेमंत द्वितीये शहरातील आयनॉक्स चित्रपटगृहामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपट पाहण्यासाठी आले होते. यादरम्यान द्वितीये चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर आले, तेव्हा काही शिवसैनिकांनी त्यांच्यावर पाळत ठेवत चित्रपटगृहासमोर त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

CM Uddhav Thackeray
कर्नाटक सरकार टिपू सुलतानचे धडे बदलणार

हेमंत द्वितीये यांच्याकडून शिवसैनिकांनी (Shiv Sainik) या पोस्टसंदर्भात माफी मागून घेतली. 'माझ्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेलीय. त्याबद्दल मी माफी मागतोय' असं म्हणत हेमंत यांनी माफी मागितल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांना सोडून दिलं. यावेळी हेमंत यांच्यासोबत असणाऱ्या महिलेनं, 'त्यांच्याकडून चूक झालीय. पण, यापुढं जेव्हा-जेव्हा मला सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंविरोधात अशी पोस्ट दिसेल, तेव्हा मी त्या व्यक्तीचं नाव शिवसेना शाखेत आणून देईन, असं शिवसैनिकांना सांगितलंय. त्यानंतर वाद मिटला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com