esakal | उद्धव ठाकरे करणार आमदारांशी चर्चा; सत्ता स्थापनेचा पेच सुटणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena chief Uddhav Thackeray meet Shiv sena MLA at 22 November

'सद्याच्या राजकिय परिस्थितीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सर्व आमदारांशी चर्चा करणार आहेत. २२ नोव्हेंबरला ही बैठक मातोश्री येथे दुपारी 12 वाजता होणार आहे. शुक्रवारी मातोश्रीवर होणारी ही बैठक शिवसेनेसाठी महत्वाची मानली जात आहे.

उद्धव ठाकरे करणार आमदारांशी चर्चा; सत्ता स्थापनेचा पेच सुटणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 'सद्याच्या राजकिय परिस्थितीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सर्व आमदारांशी चर्चा करणार आहेत. २२ नोव्हेंबरला ही बैठक मातोश्री येथे दुपारी 12 वाजता होणार आहे. शुक्रवारी मातोश्रीवर होणारी ही बैठक शिवसेनेसाठी महत्वाची मानली जात आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्रात सत्ताकारणामुळे जी राजकिय संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे आमदारांच्या मतदारसंघात कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहेत. हे सर्व संभ्रम निर्माण झालेल्या प्रश्नांवर विश्वासाने चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर शिवसेनेचे सर्व आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्यात थेट संवाद होणार आहे.

तारीख पे तारीखमुळे 'पीएमसी'धारक संतप्त 

पुणे झेडपी अध्यक्षपदासाठी सात तालुक्यात स्पर्धा

मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत शिवसेना कोणता निर्णय घेणार यावर महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार हे ठरणार असल्याचेही बोलले जात आहे. शिवसेना आमदारांच्या या बैठकीनंतर महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच सुटणार का याकडेही महाराष्ट्रातील जनतेचे आता लक्ष असणार आहे.

loading image