पुणे झेडपी अध्यक्षपदासाठी 7 तालुक्यात स्पर्धा; मावळचे पारडे जड

गजेंद्र बडे
Tuesday, 19 November 2019

खुल्या गटातील महिला जिल्हा परिषद सदस्यांची नावे ;- 
तुळशी भोर, अरुणा थोरात (आंबेगाव)
सुनीता गावडे, स्वाती पाचुंदकर, सविता बगाटे, सुजाता पवार (शिरूर)
शोभा कदम (मावळ)
कल्पना जगताप, अर्चना कामठे, अनिता इंगळे, पूजा पारगे (हवेली)
राणी शेळके (दौंड)
रोहिणी तावरे, मीनाक्षी तावरे (बारामती)
वैशाली पाटील (इंदापूर)

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी अडीच वर्ष कालावधीच्या अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील सात तालुक्यात रस्सीखेच होणार आहे. या पदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सात तालुक्यातील १६ महिला पात्र आहेत. शिवाय खुल्या महिला गटातून अन्य प्रवर्गातील महिलाही पात्र असतात. आज घडीला राष्ट्रवादी कांँग्रेसच्या ४२ जिल्हा परिषद सदस्यांपैकी २४ महिला सदस्या आहेत. यापैकी १६ खुल्या प्रवर्गातून तर, उर्वरित आठ जणी विविध प्रवर्गातून  निवडून आलेल्या आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली

खुल्या गटातून निवडून आलेल्यांमध्ये बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, आंबेगाव, हवेली आणि मावळ या तालुक्यातील सदस्यांचा समावेश आहे. यापैकी मावळचा अपवाद अन्य सहा तालुक्यातील प्रत्येकी एक जण सध्या जिल्हा परिषदेचा पदाधिकारी आहे. आतापर्यंत विद्यमान पदाधिकारी असलेल्या तालुक्याला सलग दुसऱ्यांदा संधी न देण्याचे पथ्य राष्ट्रवादी काँग्रेसने पाळले आहे. या पथ्यानुसार सध्या मावळ तालुक्याचे पारडे जड आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून आतापर्यंत मावळ तालुक्याला अध्यक्षपद मिळालेले नाही. दरम्यान, आजच्या आरक्षण सोडतीने अनेक दिग्गज जिल्हा परिषद सदस्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षण जाहीर; पाहा तुमच्या 'झेडपी'त कोण?

खुल्या गटातील महिला जिल्हा परिषद सदस्यांची नावे ;- 
तुळशी भोर, अरुणा थोरात (आंबेगाव)
सुनीता गावडे, स्वाती पाचुंदकर, सविता बगाटे, सुजाता पवार (शिरूर)
शोभा कदम (मावळ)
कल्पना जगताप, अर्चना कामठे, अनिता इंगळे, पूजा पारगे (हवेली)
राणी शेळके (दौंड)
रोहिणी तावरे, मीनाक्षी तावरे (बारामती)
वैशाली पाटील (इंदापूर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ZP reservation decalres for Pune ZP