निलंबन मागे घेण्याची शिवसेनेची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मार्च 2017

मुंबई - कर्जमाफीच्या मागणीवरून अर्थसंकल्पात अडथळा आणल्याने निलंबित कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची शिवसेनेने पाठराखण केली आहे.

मुंबई - कर्जमाफीच्या मागणीवरून अर्थसंकल्पात अडथळा आणल्याने निलंबित कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची शिवसेनेने पाठराखण केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज शिवसेना मंत्र्याच्या शिष्टमंडळाने विधानभवनात भेट घेतली. कर्जमाफीच्या मागणीमुळे विरोधक आक्रमक झाले होते. मात्र त्यांची मागणी रास्त आहे. त्यामुळे 19 सदस्यांचे निलंबन मागे घ्या, अशी मागणी शिवसेना मंत्र्यानी केली. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाच्या प्रथा, परंपरा व नियमानुसारच कारवाई झाल्याचे सांगत, ते सरकारमध्ये असतानाही असेच निलंबन केले होते. त्या वेळी तीन दिवस भाजप-शिवसेनेचे आमदार विधानभवनच्या पायऱ्यांवर आंदोलन करत बसल्याची आठवणही फडणवीस यांनी करून दिली.

Web Title: Shiv Sena demanded withdrawal of the suspension