

Shiv Sena's resolution to make Eknath Shinde CM again in 2029 elections
Sakal
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ता समीकरणांच्या चर्चा सुरू असतानाच शिवसेनेच्या वतीने एका मोठ्या राजकीय लक्ष्याची घोषणा करण्यात आली आहे. आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची ताकद अधिक वाढवून एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्याचा ठाम संकल्प पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. सत्तावाटप आणि महायुतीच्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.