कर्नाटकचं राजभवन गाठा अन् बोम्मई सरकार पाडा; सेनेचं भाजपला आव्हान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी शिवनेनेनं भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
uddhav-thackeray
uddhav-thackeraySakal

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याच्या विटंबना प्रकरणाचे राज्यभरात गंभीर पडसाद उमटले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार याबद्दल आक्रमक झालेअसून, त्यांनी भाजपला (BJP) धारेवर धरलं आहे. विशेषत: शिवसेनेनं याबद्दल आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातच आज शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र सामनामधून (Saamana) यावर तिखट शब्दात टीका करण्यात आली आहे. 'भाजपवाल्यांनो, बंगळुरूचे राजभवन गाठा, बोम्मईंचे सरकार आता घालवाच!' असं आव्हान भाजपला करण्यात आलं आहे.

uddhav-thackeray
न्यायालयाच्या सुनावणीकडे नजरा; एसटीचे कर्मचारी मुंबईच्या दिशेने रवाना

शिवरायांचा सन्मान आणि बंगळुरूत अपमान हे चालणार नाही अशी स्पष्ट शब्दात सामनामधून टीका कऱण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानाबद्दल बोलताना, शिवाजी महाराजांचं महात्म्य सांगितलं होतं. त्या घटनेला आठवडाही उलटला नाही तोच भाजपचं सरकार असलेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी वादग्रस्त विधान कसं करू शकतात? त्यांच्या पर्यंत पंतप्रधान मोदींचे विचार पोहोचलेले दिसत नाहीत असं मत सामनामधून व्यक्त करण्यात आलंय.

'सामना'मध्ये काय म्हटलंय?

"छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची कर्नाटकची ही पहिलीच घटना नाही. बंगळुरूत शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना झाल्याची बातमी वणव्यासारखी पसरली. महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत त्या घटनेचे पडसाद उमटले. कर्नाटकातील शिवरायांच्या विटंबनेची घटना ही छोटी घटना असल्याचे वक्तव्य करून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रयत्न केला. शिवरायांचा अपमान ही किरकोळ किंवा छोटी घटना असेल तर मोठे काय? असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो. ‘हिंदूंच्या अखिल भारतीय आधुनिक इतिहासातील युगप्रवर्तक राष्ट्रपुरुष’ असे मूल्यमापन जदुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांचे केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवराय हे गेली चार शतके कायमचे ‘पुण्यश्लोक अभिमान बिंदू’ म्हणून स्थिर आहेत. आठेक दिवसांपूर्वी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगडावर गेले व छत्रपतींना अभिवादन करून दिल्लीस परतले. चारेक दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी काशीत जाऊन विश्वनाथ मंदिर परिसरातील विकासकार्याचे उद्घाटन केले. त्या सोहळय़ात मोदी यांनी शिवरायांच्या शौर्याचा मुक्तकंठाने गौरव केला. मोगलांनी काशीसह अनेक प्रांतांतील मंदिरांचा विध्वंस केला, तेव्हा शिवरायांची भवानी तलवार संरक्षणासाठी तळपत होती, असे पंतप्रधान म्हणाले. थोडक्यात, कवी भूषण यांच्या शब्दांत सांगायचे तर…

काशी की कला जाती

मथुरामें मस्जिद बसति

अगर शिवाजी न होते तो

सुन्नत सबकी होती

मोदी यांना हेच सांगायचे होते.

uddhav-thackeray
नवाब मलिकांच्या घरी 'सरकारी पाहुणे' येणार? स्वत: दिली माहिती

शिवाजी नसते तर पाकिस्तानच्या सीमा आपल्या घरापर्यंत पोहोचल्या असत्या असे एकदा यशवंतराव चव्हाण म्हणाले होते. अशा शिवाजी महाराजांची विटंबना भाजपशासित राज्यात होते व मुख्यमंत्री बोम्मई यांना ती किरकोळ घटना वाटते हासुद्धा महाराजांचा अपमानच आहे. पुतळय़ांची विटंबना करून राष्ट्रपुरुषांचा अपमान करणे, त्यातून वातावरण खराब करणे ही एक विकृती समाजात वाढत चालली आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com