न्यायालयाच्या सुनावणीकडे नजरा; एसटीचे कर्मचारी मुंबईच्या दिशेने रवाना

संपकऱ्यांनी २० डिसेंबर पर्यंत संप सुरूच ठेवावा, विलीनीकरण पक्के असल्याचा दावा वेळोवेळी करण्यात आला होता.
Mumbai High Court
Mumbai High Courtsakal media
Summary

संपकऱ्यांनी २० डिसेंबर पर्यंत संप सुरूच ठेवावा, विलीनीकरण पक्के असल्याचा दावा वेळोवेळी करण्यात आला होता.

मुंबई : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने ३ नोव्हेंबर रोजी पुकारलेला संप अद्याप सुरूच आहे. उच्च न्यायालयाने(mumbai high court) एसटीच्या विलीनीकरणावर राज्य शासनाला समिती गठीत करण्याचे आदेश देऊन प्राथमिक अहवाल २० डिसेंबर रोजी मागितला होता. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये(st workers) २० तारखेला विलीनीकरणच होईल असा गैरसमज पसरवल्याने शेकडो एसटी कर्मचारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून, सोमवारी उच्च न्यायालयात(mumbai high court) संपाबद्दल असलेल्या सुनावणीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

संपकऱ्यांनी २० डिसेंबर पर्यंत संप सुरूच ठेवावा, विलीनीकरण पक्के असल्याचा दावा वेळोवेळी करण्यात आला होता. सध्या एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारी उच्च न्यायालयाच्या सुनावणीतून विलीनीकरणाचाच निर्णय येईल, अशाप्रकारच्या पोस्ट संपकऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या समाज माध्यमांच्या ग्रुपवर व्हायरल होत आहेत.

लढ्याशी संघटनांचा संबंध नाही : सदावर्ते

एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याशी कोणत्याही संघटनेचा संबंध नाही. एक संघटना उरली होती, मात्र तीही संपली असे समजा. काही संघटना पंढरपूरच्या प्रसादासारखे गोडगोड राहिले आहेत. आता मलाच समजावून सांगू लागले आहेत, अशी भाषणे संपकरी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte)यांनी राज्यभरात देण्यास सुरुवात केल्याने संपाची नोटीस देणाऱ्या अजय गुजर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र, आपल्याच नोटीसीवर हा संप सुरू असल्याचे सांगून अद्याप माघार घेतली नसल्याचे स्पष्टीकरण गुजर यांनी दिले. यामुळे संपकऱ्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी संपाची नोटीस दिल्यानंतर राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण संप कालावधीत अजय गुजर आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या माध्यमांशी संयुक्तरित्या चर्चा झाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com