शिवसेनेच्या आदेश बांदेकरांना मंत्रीपदाचा 'प्रसाद'

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 18 जून 2018

मुंबई : भारतीय जनता पक्षावर नाराज असलेल्या शिवसेनेला खुष करण्यासाठी आज राज्य सरकारने सिध्दीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल केला. आदेश बांदेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय व विश्‍वासू सहकारी मानले जातात. त्यातच उद्‌या (ता.19) ला शिवसेनेचा वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्र्यांनी बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देत नाराजीचा सूर मवाळ करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. 

आज राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने शासन निर्णय जाहीर करत सिध्दीविनायक गणपती न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत कमालीची राजकीय कुरघोडी सुरू असताना या निर्णयाने भाजपने एक पाऊल मागे घेत शिवसेनेचा सन्मान करण्याचे संकेत दिले.

आगामी सर्व निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्धार शिवसेनेनं केल्यानंतर पालघर लोकसभा पोटनिवडणूक व विधानपरिषद निवडणूकांत दोन्ही पक्षातली दरी अधिकच रूंदावली आहे. त्यातच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्री भेट घेतल्यानतंरही या वादावर पडदा पडला नसल्याचे संकेत शिवसेनेनं दिले असतानाही वैधानिक विकास महामंडळ व सिंचन विकास महामंडळावर भाजपने शिवसेनेला विश्‍वासात न घेता नियुक्‍त्या जाहीर केल्याने शिवसेनेत संताप आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारातही शिवसेना सहभागी होण्याचे संकेत नसल्याने भाजपला युतीसाठी मिनतवारी करावी लागत आहे. 

आदेश बांदेकर यांना थेट राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल करत शिवसेनेची नाराजी कमी करून चर्चेची दारे उघडण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचे मानले जाते. आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा सर्व शिष्टाचार, मानधन व ट्रस्टच्या कामासाठी प्रवास व निवासी भत्ताही सरकारने निर्णयात नमूद केला आहे.

Web Title: Shiv Sena leader aadesh bandekar gets state minister birth