Santosh Bangar: आमदार संतोष बांगर यांची अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Santosh Bangar

Santosh Bangar: आमदार संतोष बांगर यांची अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या मारहाणीचे दमदाटीचे व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत. अशातच पुन्हा एकदा आमदार संतोष बांगर यांची शिवीगाळ करणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय.

अयोध्या पौळ पाटील नावाच्या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार संतोष बांगर आणि एक अज्ञात व्यक्ती एकमेकांना अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आहेत.

अयोध्या पौळ पाटील या महिलेने ट्विटमध्ये म्हणटंल आहे की, शी असला गधळ, गच्च्याळ, संस्कारहीन अन जातीवरुन शिवीगाळ करणारा संविधानीक पदावर बसलेला लोकप्रतिनिधी आहे आणि आपले मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्री यांची पाठ थोपटतात म्हणे?मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यावर काही करवाई करणार का? की कौतुकाने पाठ थोपटणार?

संबंधित ऑडिओ क्लिपची 'सकाळ' पुष्टी करत नाही...

दरम्यान हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती.फक्त आमदार बांगरच नाही तर त्यांचे कार्यकर्तेसुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओ समोर आला होता.

आमदार बांगर यांनी संबंधित प्राचार्याला का मारहाण केली? याचे कारण जरी अस्पष्ट होती. या संपूर्ण प्रकारामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. वारंवार आमदार कायदेमंडळात बसून कायदे तयार करतात आणि हेच आमदार बाहेर कसे पायंदळी तुडवतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.

टॅग्स :CM Eknath Shinde