माझी दोन्ही मुलं अपघातात गेली, तेव्हा दिघे साहेबांनी मला..; शिंदेंनी सांगितला 2000 सालचा कटू प्रसंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

'तो माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस होता.'

माझी दोन्ही मुलं अपघातात गेली, तेव्हा दिघे साहेबांनी मला..; शिंदेंनी सांगितला कटू प्रसंग

मुंबई : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर (Dharmveer) या चित्रपटाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या हस्ते ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या ट्रेलरला दिग्गज उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे आणि धर्मवीर चित्रपटाबाबत (Dharmaveer movies) आपल्या भावना व्यक्त केल्या. आनंद दिघे हे ठाणेकरांचं हृदय होते. आनंद दिघेंनी अनेकांना जपलं, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. याच चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आनंद दिघे यांच्याविषयी आपलं मत व्यक्त केलंय.

एकनाथ शिंदे म्हणाले, माझी दोन लहान मुलं अपघातामध्ये गेली तेव्हा मी पूर्णपणे कोलमडलो होतो. मात्र, आनंद दिघे साहेबांनी मला त्या काळात प्रचंड आधार दिला. त्यांनी मला पु्न्हा शिवसेनेसाठी काम करण्यासाठी राजी केलं. त्यावेळी आनंद दिघे माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. मी आज तुमच्यासमोर जो काही बसलोय तो फक्त आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळे आणि पाठबळामुळे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: अतृप्त आत्मे माझ्या भोवती फिरणार पण नाहीत; वसंत मोरेंचा नेमका कोणाला इशारा?

2000 मध्ये आयुष्यात घडलेल्या कटू प्रसंगाची आठवण शिंदेंनी सांगितली. ते म्हणाले, 'माझी दोन लहान मुलं दिपेश (वय ११) आणि शुभदा (वय ७) गावी बोटिंग करत असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचा जीव गेला. तो माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस होता. त्यावेळी श्रीकांतही अवघ्या १४ वर्षांचा होता. 2 जून 2000 मध्ये हा अपघात घडला. त्यानंतर मी पूर्णपणे खचून गेलो होता. त्यावेळी आनंद दिघे साहेब दर दिवसाआड माझ्या घरी यायचे. माझी विचारपूस करायचे, असंही त्यांनी सांगितलं. या समाजाला तुझी गरज आहे. तुझं कुटुंब इतकं छोटं नाही, मोठं कुटुंब आहे. तुला लोकांसाठी काम करायचं, असं दिघे साहेबांनी मला सांगितलं होतं.'

Web Title: Shiv Sena Leader Eknath Shinde Expressed His Feelings About Anand Dighe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top