'आघाडी धर्म न पाळता राष्ट्रवादीचीच भाजपशी दळभद्री युती'

Shekhar Gore
Shekhar Goreesakal
Summary

'आमदार जयकुमार गोरे, प्रभाकर देशमुख हे दोघेही आपले राजकीय शत्रू आहेत.'

बिजवडी (सातारा) : राज्यात आघाडीचे सरकार असताना आघाडी धर्म न पाळता राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) जिल्हा बँक निवडणुकीत (Satara District Bank Election) शिवसेनेच्या (Shiv Sena) उमेदवाराविरोधात भाजपशी युती करते. माण पंचायत समितीत शिवसेनेच्या सभापतीविरोधात अविश्वास आणायला राष्ट्रवादी भाजपला (BJP) बरोबर घेत दळभद्री युती करते अन् चोराच्या उलट्या बोंबा मारत दहिवडीत स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी केलेल्या युतीला गोरे बंधूंची छुपी, अभद्र युती म्हणताना विरोधकांना लाजा वाटायला हव्यात. गोरे बंधूंची युती असे सांगत त्या नावाखाली राष्ट्रवादी आपला राजकीय स्वार्थ साधून घेत आहे. आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) व प्रभाकर देशमुख हे दोघेही आपले राजकीय शत्रू असल्याने त्यांच्याशी युतीचा विषयच येत नाही. त्यामुळे जिल्हा बँकेत व पंचायत समितीत युती करणाऱ्या राष्ट्रवादीने अन् दळभद्री बोलघेवड्यांनी आमची मापे काढू नयेत, असा इशारा सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे (Shekhar Gore) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिलाय.

शेखर गोरे म्हणाले, राष्ट्रवादीला बरोबर घेऊन बाजार समिती, दहिवडी नगरपंचायत आदी निवडणुका (Dahiwadi Nagar Panchayat Election) लढवण्याचा व आघाडी धर्म पाळण्याचा शिवसेनेने अनेकदा प्रयत्न केला. परंतु, या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते आमच्याच पक्षाची मापे काढत आघाडी धर्म न पाळता सवता सुभा करतात. त्यामुळे आम्हीही आमच्या स्थानिक कार्यकर्ते व नेतेमंडळींना स्थानिक निवडणुकांत स्वातंत्र्य दिलंय. त्यामुळे ते कोणाशी युती करतात, याकडे आपण लक्ष देत नाही. काही ठिकाणच्या सोसायट्या घेतल्या म्हणून राष्ट्रवादीने हवेत जावू नये. आम्ही प्रत्येक सोसायटीत सहभाग घेतला तर तुम्हाला अवघड जाईल. मी एखाद्या निवडणुकीत लक्ष घातल्यानंतर काय करतो ते विरोधकांनाही माहित आहे. त्यामुळे विरोधकांनी बेताल वक्तव्ये करताना जपून करावीत, असा इशाराही त्यांनी दिलाय.

Shekhar Gore
राणा म्हणजे, देवेंद्र फडणवीसांनी तयार केलेलं बुजगावणं : बच्चू कडू

..तर राजीनामा देऊन लढावं

शेखर गोरेने एखाद्या निवडणुकीत लक्ष घातलं तर ती निवडणूक कसे लढतो हे विरोधकांनाही चांगलंच माहित आहे. गोरे बंधूंची युती म्हणणाऱ्यांना माझं एक सांगणं आहे की, तुमच्यात एवढीच खुमखुमी असेल तर दहिवडी सोसायटीत पुन्हा एकदा राजीनामे देऊन निवडणूक लढवावी. शिवसेना तुमच्या विरोधात कुठेही लढायला तयार आहे. मग, शेखर गोरे निवडणुकीत उतरवल्यावर काय होत ते दाखवून देतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com