Shiv Sena Minister absence from Cabinet Meeting : शिवसेनेचे मंत्री कॅबिनेट बैठकीला का होते गैरहजर?, उदय सामंतांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले...

Uday Samant Official Statement on the Absence : आम्हाला जे काय हवंय ते आम्ही मुख्यमंत्र्यांनाच सांगणार, नाहीतर कोणाला सांगणार? असंही म्हणाले आहेत.
Shiv Sena Minister Uday Samant addresses media explaining the reason behind the Cabinet Meeting absence.

Shiv Sena Minister Uday Samant addresses media explaining the reason behind the Cabinet Meeting absence.

esakal

Updated on

Why the Shiv Sena Minister Missed the Cabinet Meeting: राज्याच्या मंत्रिमंडळाची आज कॅबिनेट बैठक पार पडली. मात्र या बैठकीस शिवसेनेचे मंत्री गैरहजर होते. तर काही मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीला हजर न राहता, मुख्यमंत्र्यांची दालनात जाऊन भेट घेतली. यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसच्या पार्श्वभूमीवर या मंत्र्यांची नाराजी आहे. असंही बोललं जात आहे.

अखेर या सर्व प्रकरणावर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी मीडियासमोर येत खुलासा केला. उदय सामंत म्हणाले, ‘’योगेश कदम खेडमध्ये आहेत, शंभुराज हे त्यांच्या मतदारसंघात आहेत, संजय राठोड हे त्यांच्या मतदारसंघात होते आणि मी माझं नियमित चेकअप होतं त्यामुळे म्हणून मी हॉस्पिटलमध्ये होतो. त्यानंतर जिल्ह्याची आणि कोकणाची युतीसंदर्भातील बैठक ही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर होती, म्हणून मी बंगल्यावर होतो. मात्र  रवींद्र चव्हाण हे बंगल्यावर नाहीत. मंत्रालयासमोर त्यांचा बंगला आहे, त्या बंगल्यावर गुहागर संदर्भात माजी आमदार डॉ. विनय नातू आले होते, त्यांना भेटण्यासाठी येथे आलो होतो. यामध्ये नवल असण्यासारखं काय?’’

तर ‘’काही सूत्रांकडून येणारी माहिती ही चुकीची असू शकते. कोणतीही नाराजी नाही. आताही मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे एकाच बैठकीस उपस्थित आहेत. शिवाय, कॅबिनेट मिटींगलाही एकनाथ शिंदे उपस्थित होते, त्यामुळे कोणतीही नाराजी नाही.’’ असंही सामंत म्हणाले.

Shiv Sena Minister Uday Samant addresses media explaining the reason behind the Cabinet Meeting absence.
India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

याशिवाय, ‘’मंत्री जर एखादी गोष्ट सांगण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांकडे गेले तर ते राज्याचे प्रमुखच आहेत, त्यांच्याकडे अनेक गोष्टी आम्ही मांडू शकतो. आम्हाला जे काय हवंय ते आम्ही मुख्यमंत्र्यांनाच सांगणार, नाहीतर कोणाला सांगणार?  दोनच व्यक्ती अशा आहेत, ज्यांच्याकडे आम्ही आमचं चांगलं वाईट सांगू शकतो, ते म्हणजे  शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि दुसरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस. जी बैठक झालेली आहे ती खेळीमेळीने झालेली आहे. आमच्या मनात जे काही होतं.‘’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com