भाजपपेक्षा शिवसेना आमदारांची कामगिरी सर्वोत्तम!

भाजपपेक्षा शिवसेना आमदारांची कामगिरी सर्वोत्तम!

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रजा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा सादर केला असून, यामध्ये शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे हे सर्वोत्तम कामगिरी करणारे आमदार ठरले आहेत.

शिंदे यांनी सभागृहात त्यांच्या मतदारसंघातील सर्वाधिक प्रश्न विचारत सर्वोत्तम कामगिरी केली आहे, तर भाजपचे आमदार राम कदम यांनी एकही प्रश्न सभागृहात विचारला नसल्याचे "प्रजा'ने आपल्या अहवालात म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, सत्ताधारी भाजपपेक्षा कॉंग्रेसच्या आमदारांनी चांगली कामगिरी केल्याचेही अहवालात स्पष्ट झाले आहे. 

प्रजा फाउंडेशनने आमदारांचा वार्षिक अहवाल आज प्रसिद्ध केला. मागील वर्षीच्या तुलनेत आमदारांचे एकंदरीत गुण सुधारले असून, 2018 मध्ये 59 टक्‍क्‍यांवरून ते 2019 मध्ये 64 टक्के झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन आमदारांमध्ये भाजपच्या एकाही आमदाराचा समावेश नाही. दुसऱ्या स्थानावर कॉंग्रेसचे आमदार अमीन पटेल, तर तिसऱ्या स्थानावर अस्लम शेख यांचा समावेश आहे.

या वर्षी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तीन आमदारांमध्ये शिवसेनेचे सुनील शिंदे यांना 79.38 टक्के, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या अमीन पटेल यांना 79.29 टक्के आणि अस्लम शेख यांना 78.29 टक्के गुण प्रजा फाउंडेशनने दिले आहेत. शिंदे यांच्यावर ज्या राजकीय गुन्ह्याची नोंद होती, त्याची संख्या कमी झालेली आहे.

या अहवालानुसार सत्तेत नसूनही कॉंग्रेस आमदारांची कामगिरी सर्वोत्तम असून, पक्षाच्या पाच आमदारांना 75 टक्के गुण देण्यात आले असून, दुसऱ्या स्थानावर भाजप तर तिसऱ्या स्थानावर शिवसेनेचे आमदार आहेत. भाजपच्या 12 आमदारांना 65 टक्के, तर शिवसेनेच्या 13 आमदारांना 60 टक्के गुण देण्यात आले आहेत. या वेळी आमदारांची एकंदरीत उपलब्धता ही 2018 पेक्षा अधिक असून, आता 60 टक्के आमदार उपलब्ध होत असल्याचे "प्रजा'ने म्हटले आहे. 

भ्रष्टाचाराचे प्रमाण घटले 

या कार्यकाळातील आमदारांच्या भ्रष्टाचाराचेही प्रमाण घटले असून, हे प्रमाण 38 टक्‍क्‍यांवरून 14 टक्‍क्‍यांवर आलेले आहे. तसेच, मुंबईतील 36 आमदारांपैकी 13 आमदारांवर गुन्ह्याची नोंद आढळत असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच, तेराव्या विधानसभेत (2014-19) या काळात सभागृहात विचारलेल्या प्रश्नांमध्ये (2009 ते 14) या बाराव्या विधानसभा सभागृहापेक्षा 42 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे, असेदेखील अहवालात म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com