मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन समोर यावे- राऊत

वृत्तसंस्था
रविवार, 29 जानेवारी 2017

भाजप खंडणीखोर आरोपींना पक्षात घेत आहे. राज्यातील गुंड निवडून त्यांनी पक्षात घेतले आहेत. एक पाय कारागृहात असलेले गुंड त्यांनी पक्षात घेतले आहे. त्यांना महाराष्ट्रच कळला नाही.

पणजी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा आम्ही मान राखतो. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा मग आमच्यासमोर यावे. राज्य सरकारमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी रात्री मुंबईत झालेल्या सभेत युती तुटल्याबद्दल शिवसेनेला औकात दाखवू असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांवर राऊत यांच्याकडून पलटवार करण्यात आला आहे.

राऊत म्हणाले, की भाजप खंडणीखोर आरोपींना पक्षात घेत आहे. राज्यातील गुंड निवडून त्यांनी पक्षात घेतले आहेत. एक पाय कारागृहात असलेले गुंड त्यांनी पक्षात घेतले आहे. त्यांना महाराष्ट्रच कळला नाही. ज्यांची घरे काचेची असतात, ती दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकत नाहीत. भाजपला निवडणुकीवेळीच राम मंदिर का आठवते? निवडणुकीनंतर मात्र रामाला वनवासाला पाठविले जाते.

Web Title: Shiv Sena MP Sanjay Raut criticize Devendra Fadnavis