esakal | इंदिरा गांधींविषयीच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा 'यू टर्न'; पाहा काय म्हणाले!
sakal

बोलून बातमी शोधा

shiv sena mp sanjay raut rollbacks his statement over former pm indira gandhi

इंदिरा गांधींविषयीच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा 'यू टर्न'; पाहा काय म्हणाले!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यू टर्न घेतलाय. माझा वक्तव्याचा विपर्यास केला असं ट्विट त्यांनी केलयं. तसचं या वक्तव्यामुळं कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माझे विधान माग घेतो, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदिरा गांधी यांच्या कोणत्याही निर्णयावर काँग्रेस नेत्यांच्या आधी मी त्यांच्या समर्थनासाठी पुढं यायचो. तरीही माझ्या वक्तव्यामुळं कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर, मी माझे विधान मागे घेतो.
संजय राऊत, खासदार, शिवसेना

आणखी वाचा - तंगडं तोडण्याची भाषा इथं चालत नाही : संजय राऊत

काय म्हणाले संजय राऊत?
दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विट करून आपल्या वक्तव्यावर खुलासा केलाय. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, आयर्न लेडी म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी यांचे कौतुक करण्यात मी कधीही कमी पडलो नाही. मला आश्चर्य वाटतं की, ज्यांना इंदिरा गांधी यांचा इतिहास माहिती नाही, ते आता आरडा-ओरडा करत आहेत. करीम लाला हे पठाण समुदायाचे नेते होते. पख्तुन-ए-हिंद ही पठाणांची संघटना ते चालवायचे. त्यामुळं त्यांची अनेक नेत्यांशी भेट होत होती. पण, ज्यांना मुंबईचा इतिहास माहिती नाही त्यांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला. हे ट्विट राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टॅग केले आहे.

आणखी वाचा - मोठी बातमी : संजय राऊत यांना अटक होणार का?

मूळ वक्तव्य काय होते?
संजय राऊत यांनी काल पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्याविषयी एक वक्तव्य केले होते. 'माफिया डॉन करीम लाल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट झाली होती,' अशा आशयाचे वक्तव्य राऊत यांनी केले होते. त्यावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रान उठवले. काँग्रेस आणि अंडरवर्ल्डचे संबंध होते का? याचा खुलासा काँग्रेसने करावा, अशी मागणी त्यांनी केली तर, काँग्रेस नेत्यांनीही या विधानाला आक्षेप घेतला. संजय निरूपम आणि मिलिंद देवरा यांनी हे विधान मागे घेण्याची मागणी केली होती.