मोठी बातमी : फायरब्रॅड नेते संजय राऊत यांना अटक होणार का ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

मुंबई - काल संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्या, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून आता महाराष्ट्रातील राजकारण पेटताना दिसतंय. भाजपचे नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील घाटकोपरमधल्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन राम कदम यांनी तक्रार दखल केली आहे. त्यामुळे उदयनराजे यांना संजय राऊत यांनी यांनी दिलेल्या आव्हानानंतर राम कदम आक्रमक झालेले पाहायला मिळतायत.

मुंबई - काल संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्या, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून आता महाराष्ट्रातील राजकारण पेटताना दिसतंय. भाजपचे नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील घाटकोपरमधल्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन राम कदम यांनी तक्रार दखल केली आहे. त्यामुळे उदयनराजे यांना संजय राऊत यांनी यांनी दिलेल्या आव्हानानंतर राम कदम आक्रमक झालेले पाहायला मिळतायत. 'शिवाजी महाराज की जय', याचसोबत काँग्रेसचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड झाले पाहिजेत अशा घोषणा देखील याठिकाणी देण्यात आल्या.  

मोठी बातमी - राज्यात दररोज 30 मुलांचे अपहरण, यामध्ये मुलींचं प्रमाण... 

मोठी बातमी- मंगेशकर कुटुंबाची फडणवीसांवर नाराजी, पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले..

राम कदम यांची भूमिका काय ?

"संजय राऊत यांच्या वक्तव्याने उदयनराजे यांच्या आईला काय वाटलं असेल? असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे. उदयनराजे यांनी ते कुणाचे पुत्र आहेत, कोणत्या कुळात जन्म झालाय असं आपल्या मातोश्रींना विचारावं का ? असं देखील राम कदम म्हणालेत. संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत वेदनादायक आहे. या वक्तव्याची आम्ही निंदा करतो आणि पोलिसांना संजय राऊत यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याची आम्ही मागणी करत आहोत. याचसोबत संजय राऊत यांना अटक करण्याची देखील मागणी राम कदम यांनी केली आहे. संजय राऊत यांनी कालच्या त्यांच्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी देखील राम कदम यांनी केलीये.

मोठी बातमी - उल्हासनगरमध्ये सैराट... भाऊजीला घातल्या गोळ्या

मोठी बातमी - मटणाचा झाला भडका; पाहा नेमकं काय घडलं!

काय आहे प्रकरण ?

हा संपूर्ण वाद सुरु झाला 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तिकेवरून. या पुस्तिकेत नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना करण्यात आली आहे. या पुस्तिकेला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी देखील उत्तर दिलं. उदयनराजे यांनी या पुस्तकाबद्दल मत मांडताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षावर टीका केली. या टीकेनंतर काल संजय राऊत यांनी एका प्रकट मुलाखतीत उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्या, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर आता मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत. 

bjp leader starts agitation against sanjay raut lodge complain against raut at ghatkopar police station   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader starts agitation against sanjay raut lodge complain against raut at ghatkopar police station