esakal | शिवसेनेकडून 15, काँग्रेसकडून 13 तर राष्ट्रवादीकडून 'हे' 11 आमदार मंत्रीपदासाठी आघाडीवर
sakal

बोलून बातमी शोधा

congress_ncp sena
 • मंत्रिपदासाठी इच्छुकांचे जोरदार लॉबिंग 
 • शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या आमदारांचे पक्षनेत्यांकडे दावे

शिवसेनेकडून 15, काँग्रेसकडून 13 तर राष्ट्रवादीकडून 'हे' 11 आमदार मंत्रीपदासाठी आघाडीवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या संभाव्य मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी या तीन पक्षांतील इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार, तर कॉंग्रेस पक्षाचे हायकमांड म्हणून पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे इच्छुकांनी वेगवेगळ्या मार्गांनी आपला दावा करायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. 

सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास राज्याची सत्ता कमी जास्त फरकाने तीन पक्षांत वाटली जाणार आहे. यामुळे सत्तेची पदे कमी आणि इच्छुक जास्त अशी अवस्था आहे. परिणामी, जोरदार लॉबिंग सुरू आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री यांचा समावेश केल्यास मंत्रिमंडळाची संख्या 43 होते. त्यापेक्षा जास्त संख्या वाढवता येत नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असून, उरलेल्या 42 खात्यांचे तीन पक्षांत वाटप होणार आहे. यामुळे या तीन पक्षांत इच्छुकांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीत रस्सीखेच; पेच कायम

मागील मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांनाच शिवसेना संधी देणार असल्याचे समजते, तर काही राज्यमंत्र्यांची पदोन्नती होणार असल्याचे सांगितले जाते. यामुळे शिवसेनेत नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असली तरी, जुन्यापैकी किती जणांचा पत्ता कापला जातो, याकडे लक्ष वेधले जात आहे. 

उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदासाठी सुचविलेल्या 'या' नावांना पवारांची नापसंती

शिवसेना :

 1. एकनाथ शिंदे
 2. तानाजी सावंत
 3. रवींद्र वायकर
 4. दीपक केसरकर
 5. गुलाबराव पाटील
 6. दादा भुसे
 7. संजय राठोड
 8. रामदास कदम
 9. सुभाष देसाई
 10. उदय सामंत
 11. अब्दुल सत्तार
 12. अनिल बाबर
 13. प्रकाश आबिटकर
 14. शंभूराज देसाई
 15. आशिष जैयस्वाल 

राष्ट्रवादी कॉंग्रेस :

 1. अजित पवार
 2. छगन भुजबळ
 3. जयंत पाटील
 4. दिलीप वळसे
 5. धनंजय मुंडे
 6. नवाब मलिक
 7. जितेंद्र आव्हाड
 8. हसन मुश्रीफ
 9. अनिल देशमुख
 10. मकरंद पाटील
 11. राजेश टोपे

कॉंग्रेस :

 1. बाळासाहेब थोरात
 2. अशोक चव्हाण
 3. पृथ्वीराज चव्हाण
 4. नाना पटोले
 5. यशोमती ठाकूर
 6. नितीन राऊत
 7. विजय वडेट्टीवार
 8. अमीन पटेल
 9. वर्षा गायकवाड
 10. विश्‍वजित कदम
 11. अमित देशमुख
 12. सतेज पाटील
 13. के. सी. पडवी