शिवसेनेची राजकीय कोंडी...! 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई - अस्तित्व व अस्मिता यांच्या कात्रीत शिवसेना सापडल्याचे चित्र असून, मुंबई महापालिकांच्या निकालांनी शिवसेनेची राजकीय कोंडी होण्याचे संकेत आहेत. अशा कठीण प्रसंगी कुणाच्याही दारात युतीसाठी कटोरा घेऊन जाणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची आता खरी कसोटी लागणार आहे. 

महापौरपदाच्या शर्यतीत भारतीय जनता पक्षानेदेखील कंबर कसली असून, उद्धव ठाकरे युतीबाबतचा निर्णय कसा घेतात, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. 

शिवसेनेला महापौरपद मिळवायचे झाल्यास सर्वांत सोपा व नैसर्गिक पर्याय आहे तो भारतीय जनता पक्षाला युतीचे निमंत्रण देण्याचा. शिवसेनेचा निरोप येत नाही, तोपर्यंत कोणतीही भूमिका स्वत:हून जाहीर करायची नाही, असा पवित्रा मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे समजते. त्यातच भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने मुंबईत भाजपचाच महापौर व्हावा यासाठी प्रयत्न करा, असा आदेश दिल्याचेही सांगितले जाते; तर उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत युतीचा प्रस्ताव घेऊन जाण्यासाठी आता स्वत:च घालून घेतलेले स्वबळाचे कुंपण आड येत आहे. 

त्यामुळे शिवसेना आमदार, मंत्री व नेते यांच्यात महापौर पदाच्या सुरक्षित खेळीसाठी भाजपचाच पर्याय योग्य वाटत असल्याचे संकेत मिळत आहेत, तर ज्या शब्दांत शिवसेना नेतृत्वाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रहार केले, त्याचाही रोष भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये आहे. 

एकप्रकारे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर इकडे आड तर तिकडे विहीर, अशी अगतिक परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपसोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला तर राज्य सरकारमधूनही बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा, असा एक मतप्रवाह असला तरी, ते शिवसेनेसाठीच नव्हे तर राज्यासाठीही अस्थिर सरकारचे पातक ठरेल, असा दुसरा मतप्रवाह व्यक्त होत आहे. 

Web Title: Shiv Sena political deadlock