मुंबई : शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रेंचा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा प्रकरा समोर आला आहे. कांदिवली येथील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे. यानंतर आता काँग्रेस कार्यकर्ता राजेश गुप्ता याला अटक देखील करण्यात आली आहे.
म्हात्रे काय म्हणाल्या?
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर शीतल म्हात्रे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे.
शितल म्हात्रे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलो. तेव्हापासून आम्ही ट्रोलिंगला सामोरे जात आहोत. तरी देखील आम्ही उत्तर दिलं नाही. मात्र ज्या पद्धतीने व्हिडीओ काढून त्यावर गाणं टाकून ते मातोश्री फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलं. ठाकरे गटाच्या सर्वच पदाधिकारी आणि पेजेसवर ते व्हायरल करण्यात आल्याचं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं.
स्त्रिच्या कामावर बोट ठेवायला जागा नसेल तर चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यात येता. यापूर्वी घोसाळकर यांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तरी ठाम राहिले. तेव्हा मी उद्धव ठाकरेंना याविषयी सांगितलं होतं. पण ऐकल नाही. मात्र कालच्या घटनेनंतर सर्वात आधी मला मुख्यमंत्री शिंदेंचा फोन मला आला. त्यांनी सांगितलं, घाबरू नको मी तुझ्या पाठिशी खंबीरपणे उभा असल्याचे शिंदे म्हणाल्याचंही म्हात्रे यांनी सांगितलं.
नेमकं झालं काय?
शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते. या दोघांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर टाकून व्हायरल करण्यात आला . त्यामुळे शिवसेनेतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दहिसरमध्ये एका रॅली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करत या रॅलीत सहभागी झाले. मात्र, अज्ञात व्यक्तींनी रॅलीतील एक व्हिडीओ एडीट करत यावर एक गाणं टाकलं होतं ज्यावरून आता वाद पेटला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.