

Shinde Faction Announces Boycott Of VRS Flights
Esakal
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर ते ज्या कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते त्यांच्या विमानांबाबत अनेक धक्कादायक खुलासे आतापर्यंत झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर आरोप व्हीआरएस कंपनीवर केलेत. तर दुसरीकडे व्हीआरएस कंपनीच्या ४ लिअरजेट विमानांवर डीजीसीएकडून बंदीही घालण्यात आलीय. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदारांनीही आता व्हीआरएस कंपनीच्या विमानांमधून प्रवास न करण्याचा निर्णय घेतलाय.