भाजपने 'कवळी' सांभाळून राजकारण करावे- शिवसेना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

मुंबई- "गुंडांना सत्ताधाऱ्यांची कवचकुंडले हवीच असतात व अशा गुंडांच्या मदतीने निवडणूक जिंकणे व पक्षाची व्याप्ती वाढविणे हे काळे धन जमा करण्यापेक्षा वाईट आहे. सत्तेचा तीळगूळ सगळय़ांनाच हवा असतो, पण भाजपने आपली कवळी सांभाळून असे राजकारण करावे," असा 'मित्रत्वाचा' सल्ला शिवसेनेने भाजपला दिला आहे. 

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने इतर पक्षांमधून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनेक नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. त्यावरून शिवसेनेने 'सामना' या मुखपत्रातून भाजपवर टीका केली आहे. सध्या शिवसेना-भारतीय जनता पक्षात जागावाटपावरून चर्चा सुरू आहे.

"कालपर्यंत राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली असलेले लोक सगळे एका रात्रीत 'कमल निवासा'त विराजमान झाले. 
भारतीय जनता पक्ष हा अजून तरी आमचा मित्रपक्षच आहे.. उंचे लोग उंची पसंद असे त्यांच्याविषयी म्हटले जाते. भाजप हा सत्ताधारी पक्ष असल्यामुळे दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत तीळगूळ भरवण्याचे 'गोड' कार्यक्रम सुरू आहेत,' असा चिमटा सेनेने काढला आहे.
भारतीय जनता पक्ष हा साधनशूचिता वगैरे मानणाऱ्यांपैकी असल्याचे अनेक वर्षे बोलले जात आहे. राजकारणातील गढूळ प्रवाह नष्ट करून शुद्ध चारित्र्याचे, गुंड-झुंड मुक्त असे राजकारण कोण करेल तर तो फक्त सध्याच्या मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच, असे लोकांना वाटत होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी, मुलायमसिंगांचा समाजवादी पक्ष, लालू यादवांचा राष्ट्रीय जनता दल, ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस हे पक्ष भ्रष्ट, टाकाऊ, चारित्र्यहीन, गुंडांचे पक्ष म्हणून त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी भाजपने सोडलेली नाही. मात्र, आता त्याच पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये सन्मानाने प्रवेश दिले जात आहेत. 
मनगटावरचे घडय़ाळ सोडून कमळ घेतले व देवपूजेला लागले. अनेक नामचीन लोक राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेशकर्ते झाले. त्यामुळे स्वच्छ प्रतिमा व चारित्र्याचे काय? असे विचारले जाऊ शकते. कलंकित नेत्यांना भाजपने पक्षात प्रवेश देऊ नये, असे रामदास आठवले यांनाही सांगावे लागले, अशी टीका सेनेने केली आहे.

Web Title: shiv sena slams bjp for incoming from ncp