

Shiv Sena Symbol Dispute
esakal
नवी दिल्ली : ‘‘फूट पडल्यानंतर दोन्ही गट स्वतःचीच खरी शिवसेना असल्याचा दावा करीत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्षांचे नवे नाव आणि नव्या चिन्हांवर निवडणूक लढण्यास का सांगितले नाही? ’’, अशी टिपण्णी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जॉयमल्ल्या बागची यांनी शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान केली.