खाते वाटपाचा तिढा सुटला? शिवसेनेला मिळणार 'ही' दोन महत्वाची खाती

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

महाविकास आघाडीने सरकार स्थापन करून जवळपास दोन आठवडे होत आल्यानंतरही महाराष्ट्रातील खातेवाटपाटा तिढा मात्र अजूनही कायम आहे. मात्र आज (ता.१०) तो तिढा सुटला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मुंबई : महाविकास आघाडीने सरकार स्थापन करून जवळपास दोन आठवडे होत आल्यानंतरही महाराष्ट्रातील खातेवाटपाटा तिढा मात्र अजूनही कायम आहे. मात्र आज (ता.१०) तो तिढा सुटला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गृह खाते आणि नगरविकास खाते हे शिवसेनेकडेच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, गृहनिर्माण आणि अर्थ खाते हे राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचे समजते. गृहखाते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच असणार असल्याचीही माहिती देण्यात येत आहे.

नितीश कुमार यांना झटका; जेडीयू'मध्ये दोन उभे गट

खातेवाटपाचा तिढा पुढील 24 तासात सुटणार असून 24 तासाच्या आत तीनही पक्षाच्या मुख्य नेत्यांची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन-दोन मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena will get Home ministry in Maharashtra Government