शिवस्मारक उभारणीला अखेर मुहूर्त 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

मुंबई - आंतरराष्ट्रीय दर्जाचे अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाच्या उभारणीला अखेर मुहूर्त मिळाला असून, 24 ऑक्‍टोबरला प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात होणार आहे. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ही माहिती दिली. 

मुंबई - आंतरराष्ट्रीय दर्जाचे अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाच्या उभारणीला अखेर मुहूर्त मिळाला असून, 24 ऑक्‍टोबरला प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात होणार आहे. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ही माहिती दिली. 

शिवस्मारक उभारणीचे कंत्राट "एल ऍण्ड टी' कंपनीला दिले आहे. प्रत्यक्ष बांधकाम 12 मार्च 2018 रोजी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव ते आतापर्यंत सुरू झाले नव्हते. दरम्यान, बांधकामाचा खर्चदेखील 643 कोटी रुपयांनी वाढला असून आता 24 ऑक्‍टोबरपासून समुद्रात भराव टाकण्याचे काम सुरू होणार आहे. 24 ऑक्‍टोबरला दुपारी तीन वाजता कामाची सुरवात होईल, अशी माहिती मेटे यांनी दिली. 

शिवस्मारकाचे बांधकाम 36 महिन्यांत पूर्ण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शिवस्मारकाला पर्यावरणासह इतर विभागाच्या तांत्रिक मान्यतांची आवश्‍यता होती. त्यातच स्मारकाच्या उभारणी संदर्भात न्यायालयात याचिकादेखील दाखल झालेल्या होत्या. मात्र, शिवस्मारक समितीने या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात यश मिळवले असून, महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या भव्य स्मारकाची उभारणी लवकरच पूर्णत्वास जाईल असा विश्‍वास विनायक मेटे यांनी या वेळी व्यक्‍त केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बांधमाकाचा प्रारंभ करण्यासाठी अशा प्रकारे कार्यक्रम आखावा यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही मेटे यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Smarak construction will be started on October 24 says vinayak mete