शिवाजी महाराज आमची ओळख, आमचा श्वास; आव्हाडांच्या अटकेनंतर सुप्रिया सुळे संतप्त

शिवाजी महाराज आमची ओळख, आमचा श्वास; आव्हाडांच्या अटकेनंतर सुप्रिया सुळे संतप्त

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. हर हर महादेव चित्रपटावरून विवियाना मॉलमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी त्यांना अटक केल्याचं सांगण्यात येत आहे. चित्रपटगृहात एका तरुणाला मारहाण झाली होती. शिवाय शो देखील बंद करण्यात आला होता. त्यामुळे मोठा वाद झाला होता. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आली आहे. (Supriya Sule angry after jitendra Awhad's arrest )

शिवाजी महाराज आमची ओळख, आमचा श्वास; आव्हाडांच्या अटकेनंतर सुप्रिया सुळे संतप्त
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात काय सुरू आहे हेच कळायला मार्ग नाही. चूक करणाऱ्याला माफी देण्यात येते आणि जो आंदोलन करतो, त्याला अटक करण्यात येत आहे. एकप्रकारे ब्रिटीशराज सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात कोणी चुकीच दाखवत असेल आणि कोणी विऱोध केल्याने त्याला अटक होत असेल तर मी या अटकेचं स्वागत करते, अस सुळे यांनी सांगितलं.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांविरोधात गेल्याने कारागृहात जावं लागत असेल तर आम्ही सर्वजण कारागृहात जाण्यास तयार असल्याचं सुळे यांनी म्हटलं. ऐतिहासिक सिनेमे बनवताना काळजी घेतली पाहिजे. दंतकथेवर चित्रपट करा, पण शिवाजी महाराज ही दंतकथा नाही. शिवाजी महाराज आमची ओळख आहे. आमचा श्वास आहे. चित्रपटात बांदल आणि पाटील कुटुंबावर सांगण्यात आलं. बांदल कुटुंब भोरमधील आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात होते हे कोणी सांगितलं. या विकृतीबद्दल मी बोलणारही नव्हते, असंही सुळे यांनी नमूद केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com