शिवजयंती साधेपणाने साजरी करणार; अजित पवार यांचा विश्वास

Shivjayanti
Shivjayanti

पुणे - राज्यात येत्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आवश्यक खबरदारी घेत आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून, नियमाचे पालन करील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. परंतु संभाजी ब्रिगेडसह काही संघटनांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करणार असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात पवार म्हणाले, गेल्या वर्षभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महापुरुषांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. तसेच, संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला‌. यंदा शिवजयंतीचा कार्यक्रम केवळ 100 यांच्या उपस्थितीत होईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com