

Shivraj Motegaonkar, RCC coaching director, seen in a viral interview video demanding strict punishment for paper leaks, now arrested by CBI in NEET 2026 paper leak case.
esakal
महाराष्ट्रात नीट-युजी 2026 परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठी कारवाई करत प्रा. शिवराज मोटेगावकर यांना अटक केली आहे. या अटकेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून शिक्षण क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे.शिवराज मोटेगावकर हे रेणुकाई करिअर सेंटर (RCC) या प्रसिद्ध कोचिंग क्लासचे संचालक आहेत. नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात कार्यरत असलेल्या संघटित टोळीचे ते सक्रिय सदस्य असल्याचा गंभीर आरोप सीबीआय कडून करण्यात आला आहे.