रायगडावर 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. 

महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. 

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक छत्रपती संभाजीराजे व युवराज शहाजीराजे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 ला दुर्गराज रायगडावर राज्याभिषेक झाला. त्या सुवर्ण दिनाची स्मृती कायम राहावी, या उद्देशाने अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहाने साजरा होत आहे. रायगडावर 5 जूनला रायगड विकास प्राधिकरणातर्फे स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. 6 जूनला सकाळी मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. सकाळी 9.30 वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे राजसरदरेवर आगमन होईल. शिवरायांच्या उत्सवमूर्तीचे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते विधिवत पूजन, अभिषेक व त्यानंतर मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णाभिषेक केला जाईल. 

Web Title: Shivrajyabhishek Day ceremony on 6th June at Raigad