

Raigad Fort Ready for 353rd Shivrajyabhishek Celebration
Esakal
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पाच व सहा जूनला शिवराज्याभिषेक सोहळा वैविध्यपूर्ण उपक्रमांनी होत आहे, अशी माहिती समितीतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस समित्या तयार केल्या आहेत.