दाढी करण्यासाठी 'हीच ती वेळ', शिवसैनिकाचं तीन वर्षानंतर होणार स्वप्न पूर्ण

harsh.jpg
harsh.jpg

जालना : आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत मी दाढी काढणार नाही, अशी शपथच एका शिवसैनिकाने घेतली होती. आता त्याचे स्वप्न पुर्ण होण्याची वेळ आल्याने तो शिवसैनिक खुश आहे. व आपण आता शपथविधी झाल्यानंतर दाढी काढणार आसल्याचे त्याने सांगितले.  हर्षवर्धन त्रिभुवन असं या शिवसैनिकाचं नाव आहे. तो जालण्यातील आहे.

हर्षवर्धन जाधव हा उच्चशिक्षित युवक आहे. हाडाचा शिवसैनिक असलेल्या हर्षवर्धनने तीन वर्षांपूर्वी शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊपर्यंत दाढी न करण्याचा निर्णय घेतला. सध्या तो एका खासगी रुग्णालयात काम करतो आणि कायद्याचं शिक्षण घेतो. आपल्या संकल्पाबद्दल बोलताना हर्षवर्धन म्हणाला, “दाढी न करण्याचा निर्धार ही कुठलीही अंधश्रद्धा नसून माझी श्रद्धा आहे. लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि मी दाढी करेन.”

हर्षवर्धनवर लहानपणापासून बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव आहे. त्यामुळे त्याने तीन वर्षांपूर्वी 27 नोव्हेंबरला जन्मदिनाच्या दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तेव्हाच दाढी कापेन, असा निर्धार केला. दररोज आरशात बघताना वाढलेली दाढी पाहून शिवसेना मजबूत करण्याची आठवण येत राहील. म्हणून हा निर्धार केल्याचंही मत हर्षवर्धनने व्यक्त केलं.

मागील 3 वर्षांच्या काळात लोकांनी अनेक चेष्टा मस्कीरीच्या प्रतिक्रिया दिल्याचंही हर्षवर्धन सांगतो. तो म्हणाला, “दाढी वाढवत असताना अनेकांनी माझी टिंगल उडवली. चेष्टा मस्करी केली. घरातही अनेक अडचणी आल्या. मात्र, घेतलेला निर्धार मागे घ्यायचा नाही ही बाळासाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे केलेला निर्धार मोडला नाही. आज राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे मी आनंदी आहे.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com