
- गोपीनाथ गडावर जाणार
पुणे : भाजप आणि शिवसेना हे नैसर्गिक मित्र असून, या दोन्ही पक्षांचे रक्त हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा भाजप-शिवसेनेची युती होऊ शकते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (बुधवार) सांगितले. राज्यात युतीचे सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा होऊ शकते, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप
विविध कार्यक्रमांसाठी चंद्रकांत पाटील पुण्यात आले होते. राजकीय घडामोडींसह नव्या सरकारच्या निर्णयांबाबत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "भाजप आणि शिवसेनेची गेली 30 वर्षे युती आहे. राज्यातील जनतेने युतीलाच कौल दिला होता. मात्र, सरकार स्थापन झाले नाही. भविष्यात एकत्र येऊ शकतो. सरकार स्थापन करण्यासाठी आधीपासूनच शिवसेनेच्या नेत्यांना चर्चेसाठी आमची दारे खुली होती. किंबहुना चर्चेसाठी आम्ही पुढाकार घेतला होता.''
गोपीनाथ गडावर जाणार
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी गोपीनाथ गडावर जाणार आहे. पंकजा मुंडे अन्य पक्षात जाणार नाहीत. त्यांच्याबाबत मीडियातून तशा चर्चा केल्या जात आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.