सेना-भाजपची अवस्था गाजराच्या पुंगीसारखी - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

वाशी - लोकसभा निवडणुकीनंतर साडेचार वर्षांत महाराष्ट्रातील जनता ही महागाईने होरपळून निघाली आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कामगार क्षेत्राचे खासगीकरण, वाढती बेकारी, नोटाबंदीमुळे उद्योग बुडणे अशी स्थिती निर्माण झालेली असताना केंद्र आणि राज्यातील भाजपचे सरकार मात्र जनतेला केवळ आश्‍वासनांचे गाजर दाखवत आहे. एकीकडे टीका आणि दुसरीकडे हातमिळवणी ही दुतोंडी भूमिका सर्वांसमोर आली आहे. त्यामुळे आता शिवसेना-भाजपची अवस्था ही गाजराच्या पुंगीसारखी वाजली तर वाजली नाही तर फेकली अशी झाली आहे, असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केला.

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते. ते म्हणाले, मोदी सरकारची सध्या मुस्कटदाबी सुरू आहे. कुणी काय खायचे आणि कसे लिहायचे हे केंद्रातील सत्ताधारी ठरवू लागले आहेत. त्यामुळे आता फार मोठ्या जबाबदारीने पावले उचलण्याची वेळ आली आहे. ही मुस्कटदाबी मोडून टाकण्याची हीच वेळ असून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कंटाळलेली जनता धडा शिकवेल असे ते यावेळी म्हणाले.

Web Title: Shivsena BJP Ajit Pawar Politics