शिवस्मारकाचे श्रेय घेण्याचा सरकारचा प्रयत्न : काँग्रेस

वृत्तसंस्था
शनिवार, 24 डिसेंबर 2016

मुंबई : राज्यातील सेना-भाजप युतीचे सरकार मुंबई येथील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अशा शिवस्मारकाचे श्रेय घेत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेते हुसैन दलवाई म्हणाले, "वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची संकल्पना काँग्रेसची होती. मला एक कळत नाही की ते (शिवसेना आणि भाजप) याचे श्रेय का घेत आहेत. ते काँग्रेसच्या संकल्पनेत काहीही बदल न करता ती तशीच पुढे राबवित आहेत. त्यांनी नवे असे काहीही केलेले नाही.'

आज मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिवस्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन व जलपूजन होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरील पवित्र माती तसेच जिल्ह्यांतील नद्यांचे जल असलेले कलश शुक्रवारी मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ संकलित करण्‌यात आले. राज्यभरातून आलेल्या हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत शुक्रवारी चेंबूर ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावर या कलशांची मिरवणूक काढण्यात आली. शिवस्मारकाचा हा प्रकल्प 3 हजार 600 कोटींचा आहे. जगातील स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यापेक्षाही उंच असा 192 मीटर उंचीचा हा पुतळा असेल. समुद्रामध्ये एकूण 15 हेक्‍टर जागेत हे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena, BJP unnecessary taking credit of Shivsmarak: Congress