उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन; काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही हजर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 November 2019

बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड तर काँग्रेसचे नेते भाई जगताप हजर होते. शिवसेनेचे सर्व नेते आज शिवतीर्थावर हजर होते. आज शिवतीर्थावर मात्र भाजपचा एकही नेता हजर नाही. बाळासाहेबांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो शिवसैनिकांची गर्दी शिवतीर्थावर उसळली आहे. 

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवारी) स्मृतिदिन असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही शिवतीर्थावर आले होते. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड तर काँग्रेसचे नेते भाई जगताप हजर होते. शिवसेनेचे सर्व नेते आज शिवतीर्थावर हजर होते. आज शिवतीर्थावर मात्र भाजपचा एकही नेता हजर नाही. बाळासाहेबांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो शिवसैनिकांची गर्दी शिवतीर्थावर उसळली आहे. 

आम्हाला कोणी शहाणपणा शिकवू नये; राऊतांचा फडणवीसांना टोला

आज एनडीएने घटकपक्षांची बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीला शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार नाहीत. कारण, सगळे शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर जमले आहेत. उद्धव ठाकरे, संजय राऊत, मनोहर जोशी यांच्यासह सर्व प्रमुख नेते हजर आहेत. यावेळी मुस्लिम बांधवांकडूनही त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून भगवी चादर अर्पण करण्यात  आली.

मी कॉलेजसाठी मुंबईला होतो; रोहित पवारांना बाळासाहेबांची आठवण

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच सरकार स्थापन करणार आहे. अशात आज शिवसेनेव्यतिरिक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक मोठे नेतेही हे शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस नमन करण्यास येत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena Chief Uddhav Thackeray and his wife Rashmi Thackeray pay tribute to Balasaheb Thackeray