esakal | उद्धव ठाकरेंच्या 'या' भूमिकेमुळे शिवसेना-राष्ट्रवादीचा घरोबा?
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्यांना सूचना दिल्या असून, मातोश्रीवर बोलवून त्यांना सूचना दिल्या आहेत. उद्धव यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या घरोब्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात  आहे. आजच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंच्या 'या' भूमिकेमुळे शिवसेना-राष्ट्रवादीचा घरोबा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बोलू नका, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरोबा होतोय की काय अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी रात्री सर्व आमदारांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आज दुपारी या सर्व आमदारांशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे चर्चा करणार आहेत. या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा  होण्याची शक्यता आहे. भाजपला राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी प्रवक्त्यांना राष्ट्रवादीविरोधात बोलू नका असे म्हटले आहे. 

शिवसेनेच्या आमदारांची आज बैठक; काय होणार निर्णय

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्यांना सूचना दिल्या असून, मातोश्रीवर बोलवून त्यांना सूचना दिल्या आहेत. उद्धव यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या घरोब्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात  आहे. आजच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कौतुक केले आहे. 

संजय राऊत यांचे पुन्हा ट्विट आणि पुन्हा...

तर, दुसरीकडे शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस हायकमांडकडून ग्रीन सिग्नल आल्याचे समोर येत आहे. काँग्रेस आमदारांनी एक पाऊल पुढे टाकले असून, बाहेरून पाठिंबा देण्यापेक्षा थेट सत्तेत सहभागी होण्याची काँग्रेस आमदारांची हायकमांडकडे मागणी केली आहे. याबाबत अंतिम निर्णय दिल्लीत 2 दिवसांत घेणार आहेत.