Supreme Court: शिवसेना कोणाची?, २७ तारखेच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष

शिंदे गटाची BKC वर मेळाव्याची जोरदार तयारी
shivsena
shivsenaesakal
Updated on

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघडी सरकार कोसळलं तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आजही सुरूच आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली होती. तर उद्धव ठाकरेंना या मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर शिंदे गट BKC मैदानवर दसरा मेळावा घेणार आहेत.

शिंदे गटाने BKC वर मेळाव्याची जोरदार तयारी चालू केली आहे. मेळाव्यासाठी राज्यातून दहा हजार बस आणि विदर्भातून तीन रेल्वे गाड्या बुक केल्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे BKC वर तोबा गर्दी होण्याची शक्यता आहे. परंतु आता खरी शिवसेना कोणाची आहे. यावर 27 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुनावनी मेळाव्याच्या आधी असल्यामुळे शिवसैनिकांच्या नजरा कोर्टावर लागून राहिल्या आहेत. आणि कोर्टाच्या निर्णयावर ठरवणार आहे. खऱ्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर की BKC वर होणार.

दरम्यान महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात 27 सप्टेंबरला होणार आहे. महाराष्ट्राचं प्रकरण कोर्टात कामकाजात समावेश केला आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. 27 तारखेला सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राचे प्रकरण दुसऱ्या क्रमांकावर आहे.

निवडणूक आयोगाची कार्यवाही चालू ठेवायची की नाही याबाबत सुरुवातीला फैसला अपेक्षित आहे. ७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश दिले होते. त्यामुळे 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे आदेश देण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Golden Glory for India: Satara Athlete Sudeshna Helps Team Clinch Top Honors
Love Affair Ends in Bloodshed: Wife, Lover Accused in Engineer’s Murder Plot
NCP leaders sunetra Pawar and Sunil Tatkare 
Solapur IT Park Project
Marathi News Esakal
www.esakal.com